गेस्ट पोस्टिंग म्हणजे काय
नमस्कार मित्रांनो, आज आपण गेस्ट पोस्टिंग म्हणजे काय हे बघणार आहोत. तर गेस्ट पोस्ट या नवावरूनच थोडी कल्पना येते. की कुठे तरी दुसऱ्यानच्या वेबसाइट वर, ब्लॉग वर म्हणा किवा इतर ठिकाणी तुमचा लेख प्रकाशित करणे. आपण बरेच दा बघतो आपल्या घरी जो पेपर येतो त्यात नेहमी वेगवेगळ्या लोकांचे लेख प्रकाशित झालेले असतात. तसेच जर तुम्हाला वाचनाची आवड असेल व तुम्ही वेग वेगळ्या वेबसाइटस ला जर भेट दिली असेल. तर तुम्हाला एकाच वेबसाइट वर लिहल्या गेलेल्या वेग वेगळ्या पोस्ट चा खाली, वेग वेगळ्या पोस्ट लिहणाऱ्या व्यक्तिच ( लेखकाच )नाव दिसत.
म्हणजेच त्या xyz लेखकाने त्याच लिखाण दुसऱ्या व्यक्तीचा वेबसाइट वर प्रकाशित केलेल असत व ह्यालाच गेस्ट पोस्टिंग असे म्हणतात.
गेस्ट पोस्टिंग चे फायदे काय?
- सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या लिखाणाला एक चांगला मंच मिळतो,
- तुमचे लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचत, जर तुम्हाला तुमचे लिखाण जास्तीत जास्त लोकांनी वाचले / बघितले पाहिजे अस वाटत असेल तर.
- तूचा जर काही व्यवसाय असेल तर तुम्ही त्याच्या जाहिरातीच्या हिशोबाने सुद्धा लिहू शकता.
- या मुळे तुमच्या व्यवसाया बद्दल नवीन नवीन लोकांना माहिती होईल.
- व तुमच्या त्या गेस्ट पोस्ट मुळे तुम्हाला आयुष्य भरा साठी नवीन नवीन ग्राहक मिळतील ते वेगळे.
- कीवा तुमच्या मध्ये एखादी कला असेल तर ती तुमच्या मार्फत इतर लोकांना सुद्धा शिकता येईल.
- तुम्हाला इंटरनेट वर प्रसिद्धी मिळेल ती वेगळी.
- तुमची पण एखादी वेबसाइट / ब्लॉग असेल तर गेस्ट पोस्ट मध्ये तुम्ही तुमच्या वेबसाइट ची लिंक पण अॅड करू शकता. म्हणजे लोक जस जसे त्या लिंक वर क्लिक करत राहतील तुमच्या ब्लॉग / वेबसाइट ला नवीन नवीन लोक भेट देत राहतील.
- थोडक्यात तुमच्या लिखाणाला कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहचऊ शकता. व त्या मुळे नवीन नवीन लोक तुमच्याशी जुळू लागतात. जसे की लोक एखाद्या न्यूज पेपर मध्ये लेख लिहतात व ते ज्या कोण्या कारणाने लिहत असतील. कीवा तुम्ही सुद्धा कधी लिहल असेल तो पण गेस्ट पोस्टिंग चा फायदाच आहे.
गेस्ट पोस्टिंग कुठे करावी?
- ह्या करीता तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला गूगल वर “गेस्ट पोस्टिंग वेबसाईट, फ्री गेस्ट पोस्टिंग वेबसाईट, गेस्ट पोस्ट ब्लॉग, इत्यादि. शब्द टाइप करून एका एका वेबसाइट ला भेट द्यावी लागेल. मग त्या वेबसाइट चा admin शी संपर्क करावा लागेल. व त्यांना तुम्हाला ज्या विषयावर लिहायचे आहे त्या बद्दल सांगावे लागेल, तुम्हाला त्यांच्या नियमान प्रमाणे स्वताहा लिहिलेल लिखाण पाठवाव लागेल. व त्यांना ते आवडले तर ते त्यांच्या ब्लॉग / वेबसाइट वर तुमचा लेख प्रकाशित करतील. बरेच ब्लॉग / वेबसाइट गेस्ट पोस्टिंग स्वीकारण्याचे पैसे घेतात. व बऱ्याच वेबसाइट ह्या गेस्ट पोस्ट मोफत सुद्धा स्वीकारतात. परंतु तुमच्या करिता एक आनंदाची बातमी आहे, तुम्ही आमच्या या KickStartOnline.in ब्लॉग वर सुद्धा गेस्ट पोस्टिंग करू शकता व ते पण अगदी मोफत. एक पैसा पण द्यायची आवश्यक्ता नाही.
आमच्या कडे गेस्ट पोस्ट कशा पाठवायच्या.
- अगदी सोप आहे तुम्ही Word किवा गूगल Doc वर तुमची पोस्ट लिहा व आम्हाला खाली देलेल्या ईमेल वर सेंड करूनद्या. जर तुमची वेबसाइट असेल तर तीची लिंक पण पाठवा, तुमचे नाव, व फोटो सुद्धा तुम्ही पाठवू शकता. तुमची ही सर्व माहिती पोस्ट च्या शेवटी छान Highlight करून दाखवल्या जाईल, व ते पण लाइफ टाइम साठी अगदी मोफत
- ईमेल पाठवताना सब्जेक्ट मध्ये गेस्ट पोस्टिंग रिक्वेस्ट, व पुढे तुमचा विषय लिहून पाठवा. परंतु त्या आधी गेस्ट पोस्टिंग चे काही नियम खली दिले आहेत ते जुरूर वाचा.
पोस्ट या ईमेल वर पाठवा :- [email protected]
गेस्ट पोस्ट चे नियम व शर्ती.
- पोस्ट 100% तुम्ही स्वता लिहलेली असावी. दुसरी कडून कुठून Copy Paste केलेला मुळीच चालणार नाही.
- लेख किमान २०००+ शब्दांचा असावा
- लेखात २ – ३ छान फोटो असतील तर पोस्ट अजून छान दिसेल.
- आमचे नियम व शर्ती जर जुळत नसतील असा कोणताही लेख आम्ही नाकारण्याचा अधिकार ठेवतो.
- आवश्यकता वाटल्यास तुमच्या पोस्ट मध्ये थोडा फार बदल करू शकतो. पोस्ट अधिक चांगली दिसण्याचा उद्देशाने.
- यापूर्वी आमच्या वेबसाइटवर ज्या विषयाचे लेख प्रकाशित झाले ते स्वीकारता येणार नाही. कारण एकाच वेबसाइट वर एकाच विषयाचे १००% सारखे लेख लोकांना कन्फ्युज करतील. हो पण तुम्ही एकाच विषयावर वेगळी माहिती देत असाल जी आमच्या वेबसाइट वर नाही तर मात्र तूचा लेख स्वीकारता येईल.
- मराठी व हिन्दी ह्या दोन्ही भाषेत पोस्ट स्वीकारल्यां जातील.
- अपेक्षा आहे तुम्हाला गेस्ट पोस्टिंग म्हणजे काय व आमच्या कडे गेस्ट पोस्ट कशी सादर करायची हे समजले असेल. तर भेटू या पुढच्या पोस्ट मध्ये, आणखी नवीन विषया ची माहिती घेऊन, धन्यवाद.